Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशराजनाथ सिंग-योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेतून NSG कमांडो हटवले, आता ही बटालिअन तैनात

राजनाथ सिंग-योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेतून NSG कमांडो हटवले, आता ही बटालिअन तैनात

[ad_1]

केंद्र सरकारने VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्याचे आदेश दिले आहेत.  पुढील महिन्यापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नऊ VIP च्या सुरक्षेची जबाबदारी CRPFकडे सोपवण्यात येणार आहे. ज्या VIP व्यक्तींच्या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात आहेत, त्यांच्या जागी आता सीआरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत. गृह मंत्रालयाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नवीन बटालिअन CRPF ला व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी देण्याची मंजूरी दिली आहे. 

या नऊ VIPची सुरक्षा CRPF कडे
1- यूपी सीएम योगी आदित्यनाथ, 2-मायावती, 3-राजनाथ सिंह, 4-लालकृष्ण आडवाणी, 5-सर्बानंद सोनोवाल, 6-रमन सिंह,  7-गुलाम नबी आजाद,  8-एन चंद्रबाबू नायडू, 9.फारुख अब्दुल्ला

एका महिन्यात होणार तैनात
गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढच्या एका महिन्यात एनएसजी कमांडो आणि सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत बदल करण्याचा आदेश दिले आहेत. सीआरपीएकडे व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सहा बटालिअन आहेत. आता यात सातव्या बटालिअनचा समावेश करण्यात आला आहे. नव्या बटालिअनकडे नऊ व्हिआयपींची जबादारी असणार आहे. 

संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF कडे
पीटीआय दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी संसद सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर संसदेची सुरक्षा  CRPF कडून CISF कडे सोपवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत एनएसजी कमांडो बदलून सीआरपीएफ कडे सोपवण्याची मागणी करण्यासाटी एक पथक दिल्लीत आलं होतं. 

राजनाथ सिंह आणि योगींना मिळणार एडव्हान्स सुरक्षा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 पैकी 2 व्हीआयपींना सीआरपीएफकडून स्वीकारल्या जाणाऱ्या एडवांस सिक्योरिटी कॉन्टेक्ट प्रोटोकॉल लाभही मिळणार आहे. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. एडवांस सिक्योरिटी कॉन्टेक्ट प्रोटोकॉलमध्ये, व्हीआयपी ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणाची आगाऊ माहिती घेतली जाते. याआधी CRPF कडून पाच व्हीआयपींना अशी  एडवांस सिक्योरिटी पुरवली जात आहे. यात गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबातील तीन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments