Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशमुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक

मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक

मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक

[ad_1]

मुंबईः मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पवई, ओशिवरा आणि दादर भागात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण पाच कोटी ८० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत तीन तस्करांना अटक करण्यात आली. विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त अमली पदार्थांमध्ये मेफेड्रोन (एमडी) व हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने पवईच्या साकी विहार रोड परिसरात ५ मे रोजी केली. त्यावेळी संशयावरून एका व्यक्तीला अडवण्यात आले. त्याच्या तपासणीत १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ सापडले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील अदाजे किंमत २१ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला एमडी पुरवणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत घाटकोपर युनिटने ओशिवराच्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात सापळा रचला होता. येथे एका आरोपीकडून दोन किलो ४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत सुमारे दोन कोटी चार लाख रुपये आहे.तिसरी कारवाई वरळी कक्षाने दादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळ केली. येथे एका आरोपीकडून तीन किलो ५५० ग्रॅम उच्च प्रतीचे हायड्रॉपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत अंदाजे तीन कोटी ५५ लाख कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली.

अटक केलेले आरोपी ओशिवरा व दादर परिसरात हायड्रोपोनिक गांजाची अवैध तस्करी करीत होते. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथक अधिक तपास करीत आहेत. आझाद मैदान कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, घाटकोपर कक्षाचे अनिल ढोळे आणि वरळी कक्षाचे प्रभारी संतोष साळुंखे यांच्या पथकाने या कारवाया केल्या. याप्रकरणी आरोपींच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली असून त्याद्वारे तपास करीत आहेत. तसेच आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री केली असून त्याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. जप्त करण्यात आलेला हायड्रोपोनिक गांजा परदेशातून आणल्याचा संशय आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments