Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; 'आर-पार'मध्ये...

माझ्या हिश्श्याचे किस्से: नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; ‘आर-पार’मध्ये केले होते एकमेकांसोबत काम

माझ्या हिश्श्याचे किस्से:  नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; ‘आर-पार’मध्ये केले होते एकमेकांसोबत काम

[ad_1]

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मेहबूब खान यांचा ‘अनमोल घडी’ हा एक खूप ‘अनमोल’ सिनेमा होता. त्यात नूरजहां यांनीही काम केले होते. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये नूरजहां यांच्याविषयी बोलूया. पण, त्या नूरजहां यांच्याविषयी नाही, ज्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्या. वास्तविक मी त्या नूरजहांबद्दल बोलतोय, ज्या जुन्या काळातील अभिनेत्री शकीला यांच्या लहान भगिनी होत्या आणि ज्यांनी नंतर जॉनी वॉकर यांच्याशी विवाह केला.

‘अनमोल घडी’ सिनेमा पूर्ण झाल्यावर मेहबूब खान यांच्यासमोर टायटल बनवण्यासाठी एक यादी ठेवण्यात आली. त्यावर नजर टाकल्यावर त्यांच्या लक्षात आले की, या सिनेमात एक नव्हे, तर दोन नूरजहां आहेत. एक तरुण नूरजहां आणि दुसरी वयाने लहान असलेली नूरजहां. विशेष म्हणजे, यामध्ये नूरजहांच्या लहानपणीची भूमिकाही नूरजहांच करत होती. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न पडला.

मेहबूब खान यांनी विचार केला की, तरुण नूरजहांचे नाव तर बदलता येणार नाही, कारण तोवर त्या याच नावाने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लहान नूरजहांचे नाव बदलावे, असे त्यांना वाटले. या बालिका नूरजहांचे नाव बदलून ‘नूर महल’ करण्यात आले. म्हणूनच ‘अनमोल घडी’मध्ये त्यांचे नाव नूर महल असे दिसते. त्यांनी पुढेही बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांत काम केले. त्या सगळ्या सिनेमांत त्यांचे नाव ‘बेबी बूर’ ठेवले गेले.

नूर तरुण होईपर्यंत त्यांची मोठी बहीण शकीला स्टार बनल्या होत्या. त्यांच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. एकेदिवशी लहान बहीण म्हणजे नूरजहांही त्यांच्यासोबत तिथे गेली. तिथे त्यांची जॉनी वॉकर साहेबांशी त्यांची भेट झाली. योगायोग म्हणावे की आणखी काही, ते माहीत नाही; पण त्यावेळी ‘आर-पार’ तयार करत असलेल्या गुरुदत्त यांनी या सिनेमासाठी जॉनी वॉकर यांच्यासमवेत नूर यांना घेतले. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जॉनी वॉकर आणि नूर यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली. दोघे जवळ आले, त्यांच्यात प्रेम निर्माण झाले आणि मग त्यांनी विवाह केला. जॉनी वॉकर यांच्या प्रेमात नूर यांनी एकाच सिनेमात काम करुन आपल्या करिअरचा निरोप घेतला. या गोष्टीवरुन मला प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांचा एक शेर आठवतोय..

इश्क पर जोर नहीं है

ये वो आतिश ‘गालिब’

कि लगाए न लगे

और बुझाए न बने।

अशाप्रकारे १९५४ मध्ये रिलीज झालेला ‘आर-पार’ हा नूरजहाँ यांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्यांनी आपली मोठी बहीण आणि पती या दोघांसोबत काम केले. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, लहान बहीण नूरजहां यांच्यामुळे मोठ्या बहिणीला ब्रेक मिळाला होता. त्याचे असे झाले होते की, नूर बालकलाकार असताना एकदा त्यांच्यासोबत शकीलाही शूटिंगच्या ठिकाणी गेल्या. तिथे निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदाद यांनी त्यांना पाहिले आणि आपल्या ‘दास्तान’मध्ये हीरोइनची भूमिका दिली.

शकीला यांच्याविषयी साधारण अशी धारणा बनली आहे की, त्या इराणमध्ये राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या राजकन्या होत्या. त्या राजघराण्याशी संबंधित होत्या, असे कोणी सांगायचे. कोणी म्हणायचे की, त्या अरब राजघराण्यातील आहेत. या सगळ्या धारणा आणि अंदाज पूर्णपणे चुकीचे आहेत. मी त्यांच्या कुटुंबाला व्यक्तिगत ओळखतो. त्यांचे पित्र नासिर यांच्याकडून मी हे कन्फर्मही केले आहे. नूरजी आणि शकीलाजी दोघी मुंबईच्याच होत्या आणि इथेच त्यांचा जन्म झाला होता. दोघी इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. दोघींचे शिक्षणही इथेच झाले. वास्तविक शकील यांचे सिंदबाद द सेलर, शहंशाह, राज महल, लैला और मजनू, अलीबाबा और चालिस चोर, हातिमताई, अल हिलाल असे काही सिनेमे हिट झाल्यावर त्यांचा चेहरा अरबी किंवा इराणी आहे.. त्या अरब वा इराणच्या राजघराण्यातील आहेत.. वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या. त्यामुळेच मग त्यांचा चेहरा तिकडचा आहे, अशी लोकांमध्ये धारणा तयार झाली. पुढे १९६० – ६१ मध्ये त्या भारत सोडून लंडनला गेल्या. त्यानंतर लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की, त्या अरब राजकन्या होत्या आणि त्यामुळे आता तिकडे परत गेल्या आहेत. खरे तर या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. शकीलाजी आणि नूरजी भारतीय होत्या आणि मुंबईच्याच होत्या.

आज नूरजहां आणि जॉनी वॉकर यांच्या आठवणीत त्यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘आर-पार’ या सिनेमातील हे गाणे ऐका…

अरे न न न तौबा तौबा

मैं न प्यार करुंगी

कभी किसी से

तौबा तौबा…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments