Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: गोविंदा : निवडणूक जिंकल्यावर सर्वांत आधी दिलीपकुमारांचा आशीर्वाद...

माझ्या हिश्श्याचे किस्से: गोविंदा : निवडणूक जिंकल्यावर सर्वांत आधी दिलीपकुमारांचा आशीर्वाद घ्यायची इच्छा होती

माझ्या हिश्श्याचे किस्से:  गोविंदा : निवडणूक जिंकल्यावर सर्वांत आधी दिलीपकुमारांचा आशीर्वाद घ्यायची इच्छा होती

[ad_1]

रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिलीपकुमार यांच्या सोबत गोविंदा (संग्रहित छायाचित्र)

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळं मला २००४ च्या निवडणुका आठवताहेत. तेव्हा माझा मित्र, माझा भाऊ, हिरो नंबर वन निवडणुकीत उभा होता. लोकसभेच्या या एका जागेची देशभर चर्चा होती. मला चांगलं आठवतंय, निकालाच्या आदल्या रात्री मला गोविंदाचा फोन आला. म्हणाला, ‘रूमी भाई, मी सकाळी डबिंग शेड्यूल केलंय आणि फोन बंद ठेऊन डबिंग स्टुडिओतच असेन. मीडियाचे लोक मला त्रास देऊ नयेत म्हणून मी कुठल्या डबिंग स्टुडिओत असेन, हेही सांगणार नाही. निकाल आल्यावर मी स्वत: तुम्हाला फोन करेन.’

मी ‘ठीक आहे’ म्हणालो. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान मला गोविंदाचा फोन आला. तो म्हणाला, ‘रूमी भाई, बातमी मिळालीय की मतमोजणीत मी आघाडीवर आहे, आता पराभव शक्यच नाही. विजय निश्चित आहे, असं लोक म्हणताहेत. चला, आपण तिकडं जाऊया.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे. तू तिथे पोहोच, मी मागून येतो.’ धाकटा भाऊ जामीच्या उघड्या जीपमध्ये बसून मी गोरेगाव पूर्वेला एन. एस. सी मैदानावर पोहोचलो. तिथं मतमोजणी सुरू होती. आत गेल्यावर मला सुनील दत्त साहेब दिसले. इतरही बरेच नेते होते. कारण तिथं सगळ्या मतदारसंघांची मतमोजणी सुरू होती. असो. निकाल आला आणि गोविंदा विजयी झाला. निवडणूक आयोगाने गोविंदाला प्रमाणपत्र दिलं. मग तो बाहेर आला. ढोल-ताशे वाजू लागले. कार्यकर्त्यांनी नाचायला सुरूवात केली, गोविंदाला खांद्यावर घेतलं. तिथं खूप गर्दी झाल्यानं धक्काबुक्कीही होत होती. मी जामीला गाडी सुरू करायला सांगितलं आणि आम्ही निघालो.

मी हायवेवरून जात होतो, तेवढ्यात बाजूने गोविंदाचा ताफा आला. गोविंदा पजेरो गाडीत होता. मी उघड्या जीपमधून जात असल्याचं त्यानं पाहिलं आणि लगेचच आपली गाडी थांबवली. तो खाली उतरला. माझ्याकडं येऊन म्हणाला, ‘रूमी भाई, मी तुमच्यासोबत येतो..’ आमच्या जीपमध्ये फक्त दोनच सीट होत्या. जामीने मागचं सीट काढून टाकलं होतं आणि ती तशीही ती उघडी जीप होती. मी गोविंदाला समजावलं, पण त्यानं ऐकलं नाही. आम्हाला म्हणाला, ‘मी जीप चालवतो. जामी, तू मागच्या बाजूला मांडी घालून बस. रूमी भाई, तुम्ही माझ्या शेजारी बसा..’ या प्रसंगामुळं मी खूप भारावून गेलो. गोविंदाच्या प्रेमाचं अन् साधेपणाचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? तो आत्ताच निवडणूक जिंकलाय, खासदार झालाय आणि सुपरस्टारही आहे. पण, अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. यावरून मला जुनैद​​ हजी लारी यांचा एक शेर आठवतोय…

वो सादगी में भी है

अजब दिलकशी के लिए,

इस वास्ते हम उसकी

तमन्ना में जाकर जी लिए।

असो. आम्ही जूहूमधील गोविंदाच्या फ्लॅटवर पोहोचलो. तिथं लोक यायला लागले होते. गोविंदा मला म्हणाला, ‘रूमी भाई, लोक इकडे येताहेत, पोलिसही जमतील. मग इथून बाहेर पडणं कठीण होईल. आपण इथून लगेच निघूया.’ मी गोविंदाला, कुठं जायचंय, असं विचारलं. तो म्हणाला, ‘मला तीन जणांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. चला..’ हे कोण तीन लोक आहेत, असं विचारलं तर म्हणाला, ‘चला तर खरं, मी तुमची ओळख करून देतो.. या तिघांना भेटल्यावरच मी इतरांना भेटेन..’ मग आम्ही दोघे त्याच्या पजेरोमध्ये बसून आधी दिलीपसाहेबांच्या बंगल्यावर गेलो. पण, आमचं नशीब खराब होतं. दिलीपजी आणि सायराजी बंगल्यात नव्हते. त्यांचे प्रॉडक्शन मॅनेजर बशीरभाई यांनी हे दोघेही बंगल्यात नसल्याचं सांगितलं. तिथून आम्ही उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ साहेबांकडे गेलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. तिथून मेहबूब स्टुडिओकडे निघालो. गोविंदा म्हणाला, ‘मेहबूब साहेब माझ्या वडिलांचे गॉडफादर होते..’

आम्ही मेहबूब स्टुडिओत पोहोचलो. तिथे मेहबूब साहेबांच्या सुपुत्राला भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. निघताना आम्ही पाहिलं की समोर एक व्हॅनिटी व्हॅन उभी आहे. तिथं बच्चन साहेबांचं शूटिंग सुरू होतं. बच्चन साहेब व्हॅनमध्ये बसले होते. मी आणि गोविंदा आतमध्ये गेलो. गोविंदाने निवडणूक जिंकल्याची बातमी तोवर बच्चन साहेबांपर्यंत पाेहोचली होती. त्यांनी उठून गोविंदाला मिठी मारली. अभिनंदन केलं. मला अजूनही आठवतंय, ते एक डायलॉग बोलले होते, ‘चीची भैया, हम इस दौर को देख कर आये हुए है, ये तो सिर्फ अंगड़ाई है, आगे और लड़ाई है।’

तेथून आम्ही घरी आलो. मुंबईतील मोठमोठे लोक, उद्योजक, व्यावसायिक गोविंदाची वाट पाहात होते. त्याला भेटण्यासाठी, त्याचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. मी माझ्या आयुष्यात अशा कोणाही खासदाराबाबत ना कधी ऐकलं होतं ना वाचलं होतं की, जो निवडणूक जिंकलाय आणि स्वत: सुपरस्टारही आहे, तरी आपला विजय साजरा करायचा सोडून ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरी गेला होता. गोविंदासारखा संस्कार असलेला माणूसच हे काम करू शकतो. या आठवणीसोबत गोविंदाच्या ‘जैसी करनी वैसी भरनी’ चित्रपटातील हे गाणं ऐका…

जो बोएगा वही पाएगा,

तेरा किया आगे आएगा,

सुख दुख है क्या फल कर्मो का,

जैसी करनी वैसी भरनी,

जैसी करनी वैसी भरनी।

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

(तळटीप)
सर्वाधिकार लेखक-प्रकाशकाकडे सुरक्षित. लेखी पूर्वसंमतीशिवाय या लेखातील कोणताही भाग पुनर्प्रकाशित करता येणार नाही किंवा लेखाचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर करता येणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments