Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशमरायचं असेल तर हे बटण दाबा…; जगातील पहिल्या 'सुसाइड मशीन' ने घेतला...

मरायचं असेल तर हे बटण दाबा…; जगातील पहिल्या ‘सुसाइड मशीन’ ने घेतला महिलेची जीव, अनेकांना अटक

[ad_1]

अमेरिकेतील ६४ वर्षीय महिला आत्महत्या करण्यासाठी सुसाईड पॉडचा वापर करणारी जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे. मात्र, या महिलेच्या मृत्यूनंतर आता स्वित्झर्लंडमध्ये अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्विस-जर्मन सीमेजवळ सोमवारी दुपारी थ्रीडी प्रिंटेड सुसाईड मशिनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या मशिनला टेस्ला ऑफ युथेनेशिया (इच्छामृत्यु) असेही म्हटले जाते. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या धोकादायक मशिनने एक भीतीदायक संदेश दिला होता. मशीन म्हणाली, “मरायचं असेल तर हे बटण दाबा’. स्वित्झर्लंड हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे परदेशी लोकांना कायदेशीररित्या इच्छामृत्यूची परवानगी मिळू शकते. सोमवारी आरोग्यमंत्री एलिझाबेथ बॉम-श्नाइडर यांनी ही मशीन कायदेशीर नसल्याचे म्हटले होते. मशीन सुरक्षा विषयक नियमांच्या मागण्यांची पूर्तता करत नाही, त्यामुळे याचा वापर करू नये.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments