Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी जरांगेंना बारामतीवरून फोन? महायुतीच्या आरोपावर शरद पवार यांनी दिलं...

निवडणुकीतून माघार घेण्यासाठी जरांगेंना बारामतीवरून फोन? महायुतीच्या आरोपावर शरद पवार यांनी दिलं उत्तर…

[ad_1]

मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केली. दरम्यान, जरांगे पाटील यांना बारामतीतून आदेश गेला असावा. त्यामुळे त्यांनी रणांगणातून पळ काढला असावा, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘मनोज जरांगे यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. यात महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध नाही. जसा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता तसाच निवडणूक न लढवण्याचा निर्णयही त्यांचाच आहे.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. मुंबईत पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बंडखोरांना समजवण्यात यश येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरांशी बोलत आहेत. आम्हाला कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत नको आहे, असं शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments