Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक..! ज्याचा खून केला त्याच्या अंत्ययात्रेतही सामील झाला; आरोपीला अटक

धक्कादायक..! ज्याचा खून केला त्याच्या अंत्ययात्रेतही सामील झाला; आरोपीला अटक

[ad_1]

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शहरात दिवसाढवळ्या सुवर्णकाराचा खून झाल्याने तिवसामध्ये खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अथक परिश्रम करून आरोपीला बेड्या घातल्या आहे. केवळ मजुरीचे पैसे वाढवून दिले नाही म्हणून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खून करणारा दुसरा तिसरा कुणी नसून गेले चार महिने घरात गवंडीकाम करणारा मजूर निघाला आहे. याप्रकरणी रोशन तांबटकर (वय २५) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रोशन हा मूळचा वर्धा शहरातील देऊरवाडा येथील रहिवासी आहे. मृतक मांडळे यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम गेले चार महिने सुरू होते. रोशन हा मांडळे यांच्या घरात चार महिने गवंडीकाम करतोय. यादरम्यान मांडळे यांच्या मुलासोबत आरोपी रोशन याची मैत्री झाली होती. शिवाय मांडळे कुटुंबीय कधी कुठे जातात, याची अचूक माहिती आरोपीने टिपून घेतली होती. त्यामुळे घरात कुणी नसताना आरोपीने मृतक मांडळे यांना सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एकटे गाठले. त्यांच्याकडे मजुरीपेक्षा अधिक पैशाची मागणी केली होती. परंतु मांडळे यांनी अधिक पैशासाठी नकार देताच आरोपीने त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments