Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रदेव तारी त्याला… नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाने झाडाला मारली मिठी… फांदीवर...

देव तारी त्याला… नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाने झाडाला मारली मिठी… फांदीवर काढले थरारक ३६ तास

देव तारी त्याला… नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाने झाडाला मारली मिठी… फांदीवर काढले थरारक ३६ तास

[ad_1]

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कितीही मोठ्या संकटावर मात करू शकतो, याची प्रचिती नुकतीच गडचिरोली जिल्ह्यात पहायला मिळाली. रविवारपासून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसतोय. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सर्वत्र भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुक्यात गुंडुनूर येथे दोन तरुण एका छोट्या बोटीच्या सहाय्याने नाला ओलांडत होते. बोट थोडे अंतर गेल्यानंतर पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अचानक जोरजोरात हेलकावे खाऊ लागली. आणि अखेर बोट उलटली. त्यातला एक जण पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने पोहत कसाबसा नाल्याचा किनारा गाठला. मात्र दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments