Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशजॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल

जॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल

जॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल

[ad_1]

Jacqueline and Sukesh Relationship :  200 कोटी रुपयांची खंडणी वसुली प्रकरणी तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश आयुष्यात पहिल्यांदा 9 दिवस नवरात्र व्रत करणार आहे. हे व्रत तो स्वत:साठी नाही तर जॅकलिन फर्नांडिससाठी करणार आहे. सुकेशने जॅकलिनसाठी खास प्रेमपत्र लिहीले आहे. यात त्याने व्रत करणार असल्याचे सांगितले आहे. सुकेशचे हे लव्ह लेटर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमध्ये कैद आहे. जेलमधून सुकेश चंद्रशेखर याने आपली कथित प्रेयसी जॅकलिन फर्नांडिसला एक प्रेम पत्र लिहिले आहे. जॅकलीनने कधीच  सुकेश चंद्रशेखरसोबते नाते स्वीकारले नाही. या पत्रातून सुकेश याने  जॅकलीनसोबतचे नाते आधिक घट्ट व्हावे यासाठी आपण प्रयत करत असल्याचे म्हंटले आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. लवकरच सर्व आरोपांमधून माझी निर्दोष सुटका होईल. यानंतर मला संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे असं देखील सुकेशने या पत्राच म्हंटले आहे. सुकेशचे हे पत्र सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

सुकेशच्या प्रेमपत्रात नेमकं आहे तरी काय?

माझी सिंहिणी, माझी बेबी जॅकलिन,
बेबी, तू ‘दोहा शो’ दरम्यान खूप; हॉट दिसत होतीस. बेबी, माझ्या बोम्मा, तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. बेबी उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे.  मी आयुष्यात प्रथमच नऊ दिवस उपवास करणार आहे. हे सर्व मी तुझ्यासाठी करत आहे. आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता कमी व्हावी यासाठी मी हे व्रत करत आहे. आईच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल. काहीही झाले तरी आपण लवकरच एकमेकांसोबत असू आणि नेहमी एकत्र राहू. सत्याचा विजय होईल. बेबी नवरात्रीच्या 9व्या दिवशी, मी तुझ्या आणि माझ्यासाठी एक विशेष पूजा आरती करणार आहे. आपल्या दोघांच्या नावाने माँ वैष्णो देवी मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात खास पूजा देखील केली जाणार आहे. मी तुझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतो. मला कुणीही तुझ्यावर प्रेम करण्यापासून अडवू शकत नाही. मी असताना तुला काहीच होणार… 

जॅकलिनवर पाण्यासारखा पैसा खर्च केला

जॅकलिनसोबत सिनेमा बनवायचा प्रस्ताव ठेवत त्यानं तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. ईडीच्या अंदाजानुसार त्यानं तब्बल 10 कोटी रुपये जॅकलिनवर उधळले. हि-याचे दागिने, इम्पोर्टेड क्रोकरी, 52 लाखांचा घोडा, 9 लाख रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या 4 पर्शियन मांजरी तिला दिल्या. तिच्यासाठी अनेकदा चार्टर्ड फ्लाईट बुक केली. वेगवेगळ्या महागड्या हॉटेलमध्ये रूम बुक केल्या.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

अवघ्या 17व्या वर्षापासून बनवाबनवीत माहीर असलेल्या सुकेश अय्याश असल्याचंही सांगितलं जातंय… तपासात सुकेशच्या आणखी अनेक चमत्कारिक कथा समोर येतील. एका चित्रपटाची कथा शोभेल, असं हे कथानक आहे. 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments