Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशकोण आहे मास्टरमाइंड तहव्वूर राणा?

कोण आहे मास्टरमाइंड तहव्वूर राणा?

कोण आहे मास्टरमाइंड तहव्वूर राणा?

[ad_1]

उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी २४ तास मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणा कुठल्याही क्षणी भारतात आणलं जाऊ शकतं…त्याला एका खास विमानानं भारतात आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबई यापैकी एका शहरातील तुरुंगात त्याला ठेवण्यात येईल. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी NIAची टीम अमेरिकेत दाखलही झाली आहे. 

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणलं जाणार आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय. त्यामुळे राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यासाठी NIAची टीम अमेरिकेत दाखल झालीय. राणाला दिल्लीत आणणार की मुंबईत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. NIAकडून 2 आठवड्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे..त्यानंतर न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

 कोण आहे तहव्वूर राणा?

– मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार
– मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा जुना मित्र 
– तहव्वूरचा जन्म पाकिस्तानातील  
– पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काही काळ काम 
– 1997मध्ये तो कुटुंबासह कॅनडात स्थायिक झाला 
– शिकागोत इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली
– 2006 ते 2008 दरम्यान हेडली अनेकदा रेकीसाठी मुंबईत आला
– हेडलीच्या प्रवासाबाबत शंका येऊ नये म्हणून राणाने मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडलं 
– मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता
– 2009 अमेरिकन तपास यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतलं

 आता तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. यावरून  मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारचं कौतुक केलंय. मात्र सरकार तहव्वूर राणावर कडक कारवाई करणार अशी अपेक्षाही देशपांडेंनी व्यक्त केली आहे. तर जोपर्यंत राणाला भारतात आणलं जात नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. 

तहव्वूर राणा याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यानं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIसह मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता. राणानं दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीची मदत केली होती. त्यानं हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकीही केली होती. 26\11च्या हल्ल्यातील जखमा अजूनही ताज्या आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा खूप उशिरानं भारताच्या हाती लागलाय. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जात आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments