Thursday, August 27, 2026
Homeसाताराआरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

आरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

आरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

[ad_1]

सातारा : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  लेकरं उन्हात आहेत तुमच्याबरोबर मी देखील उन्हात आहे. घाबरून घरात बसलो तर आरक्षण कसे  मिळणार? 70 वर्षापासून पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण असतानाही आरक्षण मिळाले नाही. मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  केले आहे. 70 वर्षांचा आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार आहे. आरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? आमच्या लेकरांनी असं काय पाप केलं असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका सध्या सुरुच आहे. दरम्यान आज जरांगेंची साताऱ्यात सभा  झाली. या सभेला सातारा शहराबरोबर पंचक्रोशीतील मराठा बांधव हजर होती. दरम्यान आज साताऱ्याचे खासदार छ. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही मनोज जरांगे भेट घेणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जाणून बुजून षडयंत्र रचले जात आहे.  आंदोलनानंतर आता पुरावे मिळायला लागले. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती. आज मराठ्यांच्या लाखाने नोंदी सापडायला लागल्या आहेत. मराठ्यांना लढायचे माहिती आहे. त्यावेळी पुरावे नाही सापडत म्हणाले आता पुरावे कसे सापडायला लागले. ज्याने लपवले त्यांची नाव समोर आले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.  

24 डिसेंबरला  आपला विजय निश्चित : जरांगे 

मनोज जरांगे म्हणाले,  24 डिसेंबरला  आपला विजय निश्चित आहे. मराठ्यांनो गाफिल राहू नका. नाहीतर लेकरांचे नुकसान करायला तुम्ही जबाबदार असाल. हैदराबादला समिती नोंदी शोधण्यासाठी गेली. या समितीचा सरकारने अहवाल स्विकारला. ज्या नोंदी मिळतील त्यांना obc मध्ये  आरक्षण मिळणार आहे. परंतु मी दोन भावांमध्ये भेद करू शकत नाही, एका भावाला खूश आणि दुसऱ्याला नाखूश करून चालणार नाही. साताऱ्यात 20 हजार नोंदी सापडल्या आहेत.यातच आपले यश आहे. नोंदी नसतील त्याच नोंदीच्या अहवालावर 24 तारखेला सरसकट आरक्षण देणार सांगितले म्हणून उपोषण मागे घेतले.  माझा काहीही स्वार्थ नाही. 

घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला : जरांगे 

मराठा आरक्षणाचा लढा आपल्यालाच लढायचे आहे. जेवढे पक्ष झाले त्या पक्षातील एकही नेता मदतीला यायला तयार नाही.  त्या नेत्यांना मराठ्यांनी किंमत द्यायची नाही. घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला आहे, त्याची लायकी नाही. माझ्या टप्प्यात आला की वाजवतो, असे म्हणत जरांगेंनी छगन भुजबळवर टीका केली आहे.  महाराष्ट्राला यशवंतरावानी वेगळी संस्कृती दिली.महात्मा फुलेंचा आदर्श ठेवायला पाहिजे होते. मराठा आणि  obc मध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. जातीय दंगली घडवून आणायचा डाव आहे, असे जरांगे म्हणाले. 

हे ही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments