Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रआदिवासी आमदारांचे मंत्रालयात ‘उड्या मारो आंदोलन’; आमदारांनी थेट तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर...

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात ‘उड्या मारो आंदोलन’; आमदारांनी थेट तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

[ad_1]

आपल्या विविध मागण्यांसाठी गेले काही दिवस आंदोलन करणारे राज्यातील आदिवासी समाजाचे आमदार आज प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आलेल्या या आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही आमदारांनी थेट मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारून आपला निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले. मंत्रालयात चक्क आमदारच संरक्षक जाळीवर पटापटा उड्या मारत असल्याचे दिसल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचे दिसून आले. मंत्रालयात सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी लगेच धावून जात जाळीवर उतरलेल्या सर्व आमदारांना बाहेर काढले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments