आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, ‘स्वत:ला एकटं समजू न

0
5


Raigad accident ambenali ghat: रायगडमधील आंबेनळी घाटात शनिवारी स्कॉर्पिओ कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात (Road Accident news) आठ जणांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण दापोली (Dapoli) येथील हर्णे येथे फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री परत येत असताना त्यांची गाडी दाभिळ गावाजवळ त्यांची कार दरीत कोसळली. यामध्ये गाडीतील आठ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी पाच तरुण हे साताऱ्याच्या आसगावमधील होते. या तरुणांच्या कुटुंबीयांची मंगळवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आसगावमध्ये जाऊन भेट घेतली. (Satara News)

महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे आणि खटाव येथील संदीप काटकर या आठ तरुणांच्या जाण्याने अनेक घरांचा दिवा कायमचा विझला. कुणाचा एकुलता एक मुलगा गेला, कुणाचा भाऊ हरपला, तर कुणाच्या आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार निघून गेला. या पार्श्वभूमीवर छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी अपघातग्रस्त युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ज्यावेळी राजे याठिकाणी पोहोचले तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना भरून आलं, त्यांनी राजेंना पाहून हंबरडा फोडला अपघातात मृत्यू झालेल्यापैकी सहा तरुण एकुलते एक असल्याचे समजतात छत्रपती उदयनराजे भोसले प्रचंड भावूक  झाले. कुटुंबीयांचं दु:ख ऐकून काही क्षण ते निशब्द झाले. मृतांपैकी एका कुटुंबातील व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी या सगळ्यांचे सांत्वन केले. “मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन. स्वतःला कधीच एकटे समजू नका. तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा, मी कायम तुमच्या सोबत आहे,” असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी उदयनराजे भोसले यांनाही अश्रू रोखता आले नाहीत. हा सगळा प्रसंग पाहताना गावातील सगळेचजण भावूक झाले होते.

Raigad Accident: रात्रीच्या अंधारात कार दरीत कोसळल्याचं कोणालाच समजलं नाही, अखेर…

साताऱ्यातील हे तरुण शुक्रवारी रात्री साताऱ्यातून हर्णेला निघाले होते. शनिवारी सकाळी ते हर्णे येथे पोहोचले. दिवसभर मौजमजा करुन झाल्यानंतर रात्री जेवून ते पुन्हा आपल्या गावी साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलादपूर ओलांडल्यानंतर आंबेनळी घाटात त्यांची कार दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारात त्यांची गाडी दरीत कोसळल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मृतांपैकी एक रितेश लोखंडे याचे वडील रविवारी दिवसभर आपल्या मुलाला फोन करत होते. 50-60 वेळा कॉल करुनही तो फोन उचलत नसल्याने त्यांनी आपले नातेवाईक आणि पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर या सर्वांची मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आली. तेव्हा त्यांचे शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटाच्या परिसरात आढळून आले. यानंतर घाटात तपास केला असता त्यांची कार 1200 फूट खोल दरीत कोसळल्याचे समजले.

आणखी वाचा

Ambenali Ghat: आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

आंबेनळी अपघातात सर्वात मोठा ट्विस्ट, तब्बल 24 तास स्कॉर्पिओ कोसळल्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता, चक्रावणारी माहिती समोर

आणखी वाचा



Source link