सुनीता नारायण यांचा कॉलम: आपण सगळे आता हवामान आणीबाणी युगात आलोय

0
22
सुनीता नारायण यांचा कॉलम:  आपण सगळे आता हवामान आणीबाणी युगात आलोय


  • Marathi News
  • Opinion
  • Sunita Narayan’s Column, We Have All Now Entered The Era Of Climate Emergency

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

उत्तर भारतात या पावसाळ्यात झालेल्या विध्वंसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विशाल असा भूभाग पाण्याखाली गेला. घरे, शाळा- रुग्णालये उद्ध्वस्त झाली. रस्ते उद्ध्वस्त झाले. शेतात पाणी शिरले. ढगफुटीच्या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळले. परिस्थिती पाहता जीवित व मालमत्तेच्या नुकसानीची कल्पना येऊ शकते. या क्षेत्रात पावसाची ही तीव्रता सामान्य नाही. ऑगस्ट महिन्यात पंजाबमध्ये ३१ पैकी २४ दिवस मुसळधार व अत्यंत मुसळधार पाऊस पडला. हवामान विभाग ११२ मिमी पेक्षा जास्त पावसाला “जोरदार’ आणि २०४ मिमी पेक्षा जास्त पावसाला “अत्यंत मुसळधार’ असे वर्गीकृत करतो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू – काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती अनुभवली गेली. हिमाचल प्रदेशने सर्व विक्रम मोडले. गेल्या तीन महिन्यांत ९०% पेक्षा जास्त दिवस मुसळधार व अतिवृष्टीची नाेंद झाली. सरकारी आकडेवारीनुसार ढगफुटीशी संबंधित पुराच्या १३ घटना घडल्या तर माध्यमांनी १० घटना नोंदवल्या. जून – ऑगस्टमध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये सामान्यपेक्षा अंदाजे ५०% जास्त पाऊस पडला. आठवड्याच्या सरासरी म्हणून पाहिले तर विध्वंसाचे प्रमाण स्पष्ट होते. उदाहरणार्थ, ऑगस्टच्या शेवटच्या पंधरवड्यात पंजाबमध्ये सामान्यपेक्षा ४००% जास्त पाऊस पडला. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान हिमाचल प्रदेशात राज्याच्या आठवड्याच्या सरासरीपेक्षा ३००% जास्त पाऊस पडला. म्हणूनच आपण अशा विध्वंसाचे साक्षीदार आहोत.

अखेर हे का घडत आहे? ही निःशंकपणे हवामान -आणीबाणी आहे. हा विनाश कोणत्याही किंमतीवर विकास करण्याच्या प्रक्रियेतील बेपर्वाईला दर्शवणारा आहे. संपूर्ण जग हवामान बदलाला कारणीभूत ठरणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी संघर्ष करत असताना हे परिणाम अधिक विनाशकारी होतील. पण आपल्याला आता सुधारणा करण्याची वेळ आली आहे. म्हणजे आपण पुढच्या वेळी पूर किंवा ढगफुटीमुळे होणारे नुकसान कमी करू शकतो.हवामान कसे बदलत आहे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे हवामान प्रणालींमध्ये बदल. आपल्याला माहिती आहे की हवामान जेवढे उष्ण असेल तितका जास्त पाऊस असेल. शिवाय ताे तुलनेने कमी दिवसांत पडेल. गेल्या हंगामात आपण संपूर्ण हंगामातील पाऊस काही तासांतच पडताना पाहिला. परंतु या हवामान पद्धतीत बरेच काही घडत आहे.

QuoteImage

आपण समाधान मानून शांत बसू शकत नाही. तसेच हवामान बदलाला दोष देऊन या प्रश्नावर आपण माणूस म्हणून काय करू शकताे, असा बहाणाही चालणार नाही. हा विनाश ईश्वर करत नाही. हे कृत्य आपलेच असून ते आता आपल्या उंबरठ्याशी येऊन पाेहाेचले आहे.

QuoteImage

पश्चिमी विक्षोभ ही नैसर्गिक घटना आहे. भूमध्यसागरीय प्रदेशातून येणारे वारे चक्रीवादळे व पाऊस आणतात. परंतु यावेळी पश्चिमी विक्षोभाचे कारण दिसत नाही. सहसा, नैऋत्य मान्सूनदरम्यान एक किंवा दोन विक्षोभ येतात. परंतु यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १९ विक्षेप दिसून आले. हे वारे प्रत्यक्षात मान्सूनच्या वाऱ्यांशी टक्कर देत आहेत. त्यामुळे उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये विनाशकारी पाऊस पडत आहे. पश्चिमी विक्षेप आर्क्टिकमधून येणाऱ्या जेट स्ट्रीम वाऱ्यांशी जोडलेले आहेत. हवामान बदलामुळे आर्क्टिक वायु प्रणाली कमकुवत होत असल्याने, ते इतर संबंधित जागतिक वायु प्रणालींवर परिणाम करत आहे.या वर्षी अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वायु प्रणालींमध्ये काहीतरी वेगळे घडत आहे. ते बंगालच्या उपसागरातून मान्सून वारे वाहत आहेत. हे अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आहे – त्यात महासागरापासून आर्क्टिक प्रदेशात वाढती उष्णता व विषुववृत्त आणि उत्तर ध्रुवामधील कमी होत जाणारा तापमान फरक यांचा समावेश आहे. ही अस्थिरता आता पुराच्या स्वरूपात आपल्यावर परिणाम करत आहे. जणू निसर्ग आपल्यावर सूड उगवत आहे.हवामान बदल हा माणसाच्या आर्थिक विकास आणि लोभातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्जनाचा परिणाम आहे. विकासाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन या समस्येला आणखी गुंतागुंतीचे करत आहे. आपण पूरग्रस्त भागात इमारती बांधत आहोत आणि पुरेसे ड्रेनेजचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहोत. डाेंगराळ भागात अतिक्रमण करत आहाेत. तेथे घरे, रस्ते आणि धरणे बांधत आहाेत. परंतु हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे का, असाही विचार केला जात नाही. मी बरेच काही सांगू शकते. परंतु मी आता पुरे झाले म्हणते तेव्हा तुम्हाला माझे दुःख समजेल अशी आशा आहे. अनुकूल व विविध पद्धतींचा अवलंब करू, असे बाेलण्याची वेळ संपली आहे. आपण आता हवामान बदलाच्या युगात जगत आहोत.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)



Source link