Monday, September 7, 2026
Homeसातारासातारा : कराडचा वेदांत नांगरे अमेरिकेत बनला सर्वात तरूण भारतीय अल्ट्रामॅन |...

सातारा : कराडचा वेदांत नांगरे अमेरिकेत बनला सर्वात तरूण भारतीय अल्ट्रामॅन | पुढारी

सातारा : कराडचा वेदांत नांगरे अमेरिकेत बनला सर्वात तरूण भारतीय अल्ट्रामॅन | पुढारी

[ad_1]

कराड : पुढारी वृत्तसेवा नुकत्याच अमेरिकेतील एरिझोना राज्याच्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे (वय 22) याने सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीरीत्‍या पूर्ण केली. सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन म्हणून त्‍याला सन्मानित करण्यात आले. सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत तरुण भारतीय अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे.

ही तीन दिवसांची खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12 तासांच्या आत पूर्ण करायचे असते. वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसांत एकूण 33 तास 46 मिनिटे लागली.

दहा डिग्री अंश थंड तापमानातही सलग साडेचार तास त्याला पोहावे लागले. तसेच सायकलिंग व रनिंगसाठी थंड वातावरणातून, बोचऱ्या वाऱ्यातून तसेच कठीण अशा चढ – उताराच्या मार्गावरून त्याला अंतर पूर्ण करावे लागले.

या स्पर्धेत स्पर्धकाला सपोर्टसाठी त्याच्या पुढे अथवा मागे कारसह क्रू मेंबरची गरज असते, जे आपल्या स्पर्धकाला योग्य कॅलरीचे खाणे देणे, रस्ता दाखविणे याकरता मदत करीत असतात. यावेळी वेदांत बरोबर त्याची आई सौ. कल्याणी नांगरे व वडील अभय नांगरे हे क्रू मेंबर्स होते. याखेरीज अमेरिकेतील हवाई येथील या स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले क्रू म्हणून बिली रिकार्ड्स हे होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी झाले.

अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यावर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोनवरून अभिनंदन केले तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील अनेक भारतीयांनी वेदांतचे विशेष कौतुक केले.

अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला. भारतामधून अमेरिकेत येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्याने आम्हाला भारतीय म्हणून वेदांतचा खूप अभिमान आहे अशा भावना येथे अनेकांनी व्यक्त केल्या.

स्वित्झर्लंडमध्ये आयर्नमॅन 

या अगोदर वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण स्‍पर्धा समजली जाते. जिद्द, चिकाटी, नियोजन, परिश्रम, त्याग, योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर वेदांतने या स्पर्धेत यश संपादन केले.

हेही वाचा : 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments