
धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव, प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, अंबादास दानवे, अजय चौधरी, अनिल परब आणि सुनील प्रभू आदिंचा समावेश होता.



