Satara News : सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील कोयना नदीत 12 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. आजोबांच्या डोळ्यासमोरच नातवाचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसात कोयना नदीत बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. या सहा दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
साताऱ्यातील कोयना नदीत आपल्या वयोवृध्द आजोबा सोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षाच्या मुलगा बुडाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील सुपने गावात आजोबाच्या डोळ्यासमोर नातू बुडाल्याची घडली आहे. कोयना नदीत गेल्या सहा दिवसात तिसरी घटना असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा बुडाला
सुपने – किरपे पुलाच्या दरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पाण्याच्या पात्रात वरद शंकर कांबळे असे बुडालेल्या नातवाचे नाव आहे. आजोबा नदीकाठाला बसून होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने नातू पाण्यात बुडू लागला तेव्हा पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. तेव्हा पुलावरील प्रवाशांनी मोठमोठ्याने आरडोओरडा केली. तेव्हा ही घटना आजोबांच्या लक्षात आली मात्र तोपर्यंत नातू बुडाला होता. सुपने गावचे पोलिस पाटील कमलेश कोळी यांनी नदीत स्वतः उडी घेत मुलाला शोधून काढले.









