ठाण्यातील विभागीय अधिकाऱ्यास कराडमध्ये कारने उडवले, जागीच मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची

0
6


Karad Accident News :  सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांला कराडमध्ये कारने उडवले आहे. या अपघातात उपविभागीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.  शनिवार, रविवार सुट्टीला घरी परतत असताना कारने उडवल्याने हा अपघात झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

घटनेनंतर घटनास्थळावरुन चालक चारचाकी कारसह फरार झाला

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील येथे मृदू व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांना कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका भरधाव चारचाकी कारने उडवले आहे.  या घटनेनंतर घटनास्थळावरुन चालक चारचाकी कारसह फरार झाला आहे. अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. कराड शहर पोलिसांकडून घटनास्थळावरील पंचनामा केला असून काही संशयितांची कसून चौकशी सुरू केली जात आहे.

नालासोपारा-विरार लिंक रोडवर भीषण अपघात, दोघांना गंभीर दुखापत

नालासोपारा-विरार लिंक रोडवरील शनी मंदिराजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ह्युंदाई आय-20 कारच्या एअरबॅग वेळेत न उघडल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.माहितीनुसार, विरारहून नालासोपाराकडे जाणारी ह्युंदाई व्हेन्यू कार आणि वळण घेत असलेली ह्युंदाई आय-20 कार यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर व्हेन्यू कारमधील सर्व एअरबॅग उघडल्याने त्यातील अर्नाळा पोलीस ठाण्याचे एपीआय पूर्बे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे दोन कर्मचारी  किरकोळ दुखापत झाली. मात्र, आय-२० कारच्या एअरबॅग न उघडल्याने त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एअरबॅग न उघडण्याच्या कारणासह अपघाताचा तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर महामार्गापासून अवघ्या २० फूट अंतरावर जाऊन पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून कार्बन डाय-ऑक्साइड वायूची गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे. 



Source link