बरड जिल्हा परिषद गट शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्या वैशालीताई कांबळे यांची निवड

0
2
बरड जिल्हा परिषद गट शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्या वैशालीताई कांबळे यांची निवड

बरड जिल्हा परिषद गट शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्या वैशालीताई कांबळे यांची निवड

फलटण | प्रतिनिधी :-फलटण तालुक्यातील बरड जिल्हा परिषद गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिवपदी शिक्षण विस्तार अधिकारी सी. जी. मठपती यांची निवड करण्यात आली आहे.

दिनांक २५ जुलै रोजी बरड येथील मॉडर्न हायस्कूल, बरड येथे समितीची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत गटातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक दर्जा वाढविणे, शाळांमधील गुणवत्ता उपक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच पालक, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

समितीमध्ये बरड पंचायत समिती सदस्या स्वाती हनुमंत आटोळे, दुधेबावी पंचायत समिती सदस्या विजया हनुमंतराव सोनवलकर, बरड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश लंगुटे, बरड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष आडके, दुधेबावी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, दुधेबावी-जावली केंद्रप्रमुख लवेश चोरमले तसेच संजय धुमाळ यांचा समावेश आहे.

नवीन समितीच्या माध्यमातून बरड जिल्हा परिषद गटातील शिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कामकाज करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सदस्य समन्वयाने कार्य करतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.