
राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बदलापूर, पुण्यानंतर आता नागपूरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. शहरात एका ८ वर्षीय चिमुकलीवर अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. अनोळखी आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतला जात आहे. पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.




