१५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर… भाजप खासदार धनंजय महाडिकांची महिलांना भरसभेत दमदाटी, VIDEO

0
14
१५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर… भाजप खासदार धनंजय महाडिकांची महिलांना भरसभेत दमदाटी, VIDEO


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. महायुती व महाआघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या प्रचारचा केंद्रबिंदू लाडकी बहीण योजना ठरत आहे. त्यातच भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या,नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा,त्यांची ‘व्यवस्था’ आम्ही करू,अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींनाच भरसभेत दमदाटी केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होतोय.



Source link