
Raj Kumar Kohli Passes away : जानी दुश्मन, नागिन, पती पत्नी और तवायफ, नौकर बिवी का, बदले की आग… अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. प्रसिद्ध अभिनेता आरमान कोहली याचे ते वडील होत. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.








