
Viral news : भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये अशिक्षित महिलांसह सुशिक्षित महिलांची स्थिती देखील बिकट झाली आहे. डॉक्टरांपासून शिक्षकांपर्यंत अनेक महिलांना आता घर चालवण्यासाठी देह विकावा लागत आहे. आधीच कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या देशात लष्करी राजवटीमुळे राजकीय अस्तिर वातावरण आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केली होती.








