कोयना नदीत बुडून दोन सख्ख्या चुलत भावंडांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना

0
3


Satara News : साताऱ्यातील कोयना धरणाजवळ धक्कादायक घटना घडली आहे. कोयना नदीत बुडून दोन सख्ख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील गाढखोप गावातील आर्यन अनिल कदम (वय -16) आणि करण दाजी कदम (वय- 14)  असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत.  

पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

कोयना नदीकडे सहा जण पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यापैकी चौघांना पोहायला येत नसल्याने ते नदीत उतारे नाहीत, या दोन भावडांना पोहायला येत असल्याने ते नदीत उतारले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकावर वाघाचा हल्ला, युवकाचा जागीच मृत्यू

जंगल परिसरात शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या एका 31 वर्षीय युवकावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ​दुलेश्वर संतोष खरकाडे (रा. कलपाथरी, ता. गोरेगाव) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. कलपाथरी गावातील रहिवासी असलेला दुलेश्वर खरकाडे हा नेहमीप्रमाणे गावाशेजारील कलपाथरी जंगल परिसरात आपल्या शेळ्यांसाठी चारा (पाला) गोळा करण्यासाठी गेला होता. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली. वाघाच्या या हल्ल्यात दुलेश्वरचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाघाने त्याचा मृतदेह 500 मीटर पर्यंत फरफटत नेला.



Source link