
दिल्लीत एका व्यक्तीचा घरात लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला आहे. सांगितले जात आहे की, घरात पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागली. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मृत व्यक्तीनेच घरात शेकोटी पेटवली होती. शेकोटीची आग भडकून हळूहळू संपूर्ण घरात पसरली. यामध्ये त्या व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. विनय अरोरा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विनय दिल्लीत बाउंसरची नोकरी करत होता. ही घटना नवीन मंगलापुरी परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. विनयचा मृतदेह त्याच्या घरातून जळालेल्या अवस्थेत मिळाला आहे.








