Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशWeather Update : बिहारमध्ये उष्णतेचा कहर! ३० तासात उष्माघाताने २१ जणांचा मृत्यू,...

Weather Update : बिहारमध्ये उष्णतेचा कहर! ३० तासात उष्माघाताने २१ जणांचा मृत्यू, पारा ४८ अंश पार

[ad_1]

बिहारमधील अनेक जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक नोंदवला आहे. गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर  दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण बिहारमधील बहुतांश भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाटणा ४२.८ अंश सेल्सिअस, गया ४६.८ अंश सेल्सिअस,  भागलपूर ३९ अंश सेल्सिअस आणि पूर्णिया ३७ अंश सेल्सिअस तापमान होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments