
Girl Dance Crowded Train Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही. सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण रील बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, अधिक लाईक्स मिळवण्याच्या नादात अनेकजण हटके रील बनवत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे, ज्यात एक सुंदर तरुणी चालत्या ट्रेनमध्ये नाचताना दिसत आहे. मात्र, तिच्या डान्सपेक्षा तिला नाचताना पाहणाऱ्या एका प्रवाशाची रिअॅक्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.







