Viral News : पुणे तेथे काय उणे! दिवाळीनिमित्त पठ्ठ्यानं केली चक्क कारला लायटिंग, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

0
1
Viral News : पुणे तेथे काय उणे! दिवाळीनिमित्त पठ्ठ्यानं केली चक्क कारला लायटिंग, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल


Pune Viral News : पुणे तेथे काय उणे असे नेमहीच म्हटलं जात. पुणे कधी काय शक्कल लावतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी एका तरुणानं त्याची गाडी चोरीला गेल्यावर थेट पोस्टर लिहून चोराला गाडी परत करण्याचे आवाहन केले होते. ही घटना ताजी असतांना आता एका पुणेरी कारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. सध्या दिवाळी असून अनेक जण आपल्या घरांना विद्युत रोषणाई करतात. आकाश दिवे लावतात. मात्र, पुण्यातील एका तरुणाने मात्र, चक्क त्याच्या गाडीला दिव्यांच्या माळा लावून लायटिंग केली आहे. त्याच्या या कारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे पुणे तेथे काय उणे याची प्रचिती आता पुन्हा आली आहे.



Source link