Wednesday, August 26, 2026
Homeसाताराबौद्ध समाजाच्या राजकीय प्रतिनिधीत्वासाठी विजय येवले यांची अजित पवार यांना मागणी

बौद्ध समाजाच्या राजकीय प्रतिनिधीत्वासाठी विजय येवले यांची अजित पवार यांना मागणी

फलटण : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची फलटण तालुका संविधान समर्थन समितीच्या वतीने सोमवारी भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान बहुजन योद्धा विजय येवले यांनी पवार यांच्याकडे मागणी केली की, गेल्या १५ वर्षांपासून राज्यातील बौद्ध समाजावर राजकीय अन्याय होत आहे. त्यामुळे यंदा फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बौद्ध समाजाला संधी द्यावी.

येवले यांनी आपल्या मागणीचे निवेदन अजित पवार यांना सुपूर्द केले. या मागणीवर प्रतिसाद देताना ना. अजित पवार यांनी सांगितले की, महायुतीमधील जागा वाटपाबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसला फलटण विधानसभा मतदारसंघाची जागा मिळाली, तर बौद्ध समाजाच्या उमेदवारीचा निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.

या भेटीत संविधान समर्थन समितीचे सदस्य माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सनी काकडे, शक्ती भोसले, संग्राम अहिवळे, महादेव गायकवाड, दया पडकर, संजय गायकवाड, रोहित माने, सूरज अहिवळे, बंटी साबळे, सागर अहिवळे, साईनाथ भोसले, वैभव काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments