
पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफयांच्या नेतृत्वातील पीएमएलएन पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात असून पक्षाकडून अनेक प्रचारसभा, रॅली केल्या जात आहेत. नवाज शरीफ यांच्यासोबतच त्यांची मुलगी मरियम नवाज आणि भाऊ शाहबाज शरीफही प्रचारात सक्रीय आहेत. पाकिस्तानमधील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या नवाज शरीफ यांची मंगळवारी लाहोरमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अशी एक घटना घडली, ज्याची चर्चा पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरात होत आहे. या रॅलीत एक वाघ व सिंह आणण्यात आला होता.







