Varun Dhawan Injured: चित्रपटाच्या सेटवर वरुण धवन झाला जखमी; फोटो शेअर करून म्हणाला…

0
13
Varun Dhawan Injured: चित्रपटाच्या सेटवर वरुण धवन झाला जखमी; फोटो शेअर करून म्हणाला…


Varun Dhawan Injured On Set: ‘भेडिया’, ‘बदलापूर’ या सारखे दमदार चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आता पुन्हा एकदा मोठा चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मोठ्या वरुण धवन पुन्हा एकदा धमाका करणार आहे. सध्या अभिनेता वरुण धवन त्याच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वरुण धवनचा हा चित्रपट येत्या नव्या वर्षात म्हणजेच २०२४मध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले नसल्याने त्याला ‘VD १८’ म्हंटल जात आहे. तर, स्वतः वरुण धवन देखील हा टॅग वापरून चाहत्यांना या चित्रपटासंदर्भात नवीन अपडेट देत असतो. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता वरुण धवन याच्या पायाला दुखापत झाली. वरुण धवन स्वतः सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याबद्दल सांगितले आहे. त्याचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले आहेत.



Source link