Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशVaranasi Accident News | वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची...

Varanasi Accident News | वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Varanasi Accident News | वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

वाराणसीत दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू!

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे बुधवारी (४ ऑक्टोबर) पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांच्या गाडीचा आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात  (Varanasi Accident News) झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलीभीत येथील एक कुटुंब वाराणसीत दर्शनासाठी आले होते. हे लोकं दर्शन करून जौनपूरला परतत असताना वाराणसी-जौनपूर महामार्गावर त्यांची कार एका ट्रकवर आदळली. अपघातानंतर सर्वात आधी स्थानिक लोक मदतीसाठी पोहोचले. त्यांनी गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह वाहनातून बाहेर काढले. या आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये विपिन यादव आणि त्यांची आई गंगा यादव, रा.रुद्रपूर, माधोतांडा पोलीस स्टेशन, पिलीभीत, महेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी चंद्रकाली, राजेंद्र यादव, रा.रुद्रपूर, अशी मृतांची नावे आहेत. धर्मगडपूर, माधोतांडा यांचा समावेश आहे. तर, अन्य मृतांची ओळख पटू शकली नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments