Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर; मुस्लिम समाजाला प्राधान्य

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर; मुस्लिम समाजाला प्राधान्य

पुणे :- आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापत असताना, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीची घोषणा करून चर्चा वाढवली आहे. 21 सप्टेंबर रोजी वंचितने पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात 11 उमेदवार होते. आज (दि. 9) आणखी 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, पुण्यातील हडपसरसारख्या प्रमुख मतदारसंघातील उमेदवारीही यात आहे. या यादीत मुस्लिम समाजातील इच्छुकांना मोठी संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे:

मलकापूर: शहजादे खान सलीम खान

बाळापूर: खतीब सैय्यद नातीकोद्दीन

परभणी: सय्यद समी सय्यद साहेबजान

औरंगाबाद मध्य: मो. जावेद मो. इसाक

गंगापूर: सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर

कल्याण पश्चिम: अयाज गुलजार मोलवी

हडपसर: अॅड. मोहम्मद उपरोज मुल्ला

माण: इम्तियाज जाफर नदाफ

शिरोळ: आरिफ मोहम्मद अली पटेल

सांगली: अल्लाउद्दीन हयातचाँद काजी

रावेरमधून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात: वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीत रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार म्हणून शमिभा पाटील यांना संधी दिली आहे. शमिभा या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडीसोबत काम करत आहेत.

पहिल्या यादीतील काही प्रमुख उमेदवार:

रावेर: शमिभा पाटील

शिंदखेड राजा: सविता मुंढे

वाशिम: मेघा किरण डोंगरे

धामणगाव रेल्वे: निलेश विश्वकर्मा

नागपूर दक्षिण मध्य: विनय भागणे

साकोली: डॉ. अविनाश नान्हे

नांदेड दक्षिण: फारुख अहमद

लोहा: शिवा नारांगले

औरंगाबाद पूर्व: विकास रावसाहेब दांडगे

शेवगाव: किसन चव्हाण

खानापूर: संग्राम कृष्णा माने

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments