
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वारसा त्यांच्याकडे सोपवून, त्या त्यांना निवडणूक डावपेच, तिकीट वाटप आणि राजकारणातील इतर बाबींमध्ये पारंगत करण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून भविष्यात बसपाची धुरा सांभाळण्याची त्यांची पूर्ण तयारी होईल. आकाश हे मायावती यांच्या प्रमाणेच पक्ष चालवतील आणि तरुणांना पक्षाशी जोडून घेतील असा विश्वास मायावती यांना आहे.






