Monday, September 14, 2026
Homeसाताराशंकेश्वर अहिवळे यांचा संघर्षमय यशाचा प्रवास – आंबेडकरी विचारसरणीचे आदर्शवत उदाहरण

शंकेश्वर अहिवळे यांचा संघर्षमय यशाचा प्रवास – आंबेडकरी विचारसरणीचे आदर्शवत उदाहरण


फलटण :- येथील कामगार कॉलनीत राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील शंकेश्वर अहिवळे यांनी आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वानुसार संघर्षमय अभ्यासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. साधारणतः एक ते दीड वर्षांच्या अंतरात, त्यांनी प्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI), त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर, आणि अखेर महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी पदावर काम करण्यास योग्यतेची परीक्षा पास केली.

अहिवळे यांचा हा प्रवास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षांमधून उज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने हे यश प्राप्त केले, ते आंबेडकरी तत्त्वज्ञानातील “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” या संदेशाचे जिवंत उदाहरण आहे.

बाबासाहेबांच्या विचारसरणीला योग्य न्याय देत, शंकेश्वर अहिवळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी पदावर स्थान मिळवून बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात त्यांचे नाव गौरवले जात आहे, आणि तरुणांसाठी ते प्रेरणास्रोत ठरत आहेत.

शंकेश्वर अहिवळे यांचे साहस टाइम्सच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

s

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments