Friday, August 21, 2026
Homeसाताराराखीच्या नात्याने पोलीस-विद्यार्थिनींचा स्नेहबंध

राखीच्या नात्याने पोलीस-विद्यार्थिनींचा स्नेहबंध

फलटण : शहरातील विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल, फरांदवाडीच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस बांधवांशी भावनिक बंध दृढ केले. आज, दिनांक ९ ऑगस्ट रोजी, इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या एकूण ४८ विद्यार्थिनींनी फलटण शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांना स्वतःच्या हस्ते राख्या बांधल्या.

वर्गशिक्षिका पूजा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने पोलीस ठाण्यातील वातावरण भारावून गेले होते. रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा अनुभव घेताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद स्पष्ट जाणवत होता.

पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे पोलिस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते आणखी दृढ होते.”

यावेळी फलटण शहर पोलिसांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थिनीला बिस्कीट पुडा आणि पेन्सिल भेट म्हणून देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पोलिस ठाण्यातर्फे शाळा, विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments