
Tharala Tar Mag 17 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक खास वळण येताना पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्या आता स्वतःहून आपल्या आठवणी परत कशा येतील, याचा प्रयत्न करत आहेत. हे बघून आता सायलीला खूप आनंद होणार आहे. प्रतिमा आत्याला तिचा भूतकाळ आठवावा यासाठी जर कुणी मुद्दाम प्रयत्न केले तर, त्याचा त्यांना त्रास होईल. इतकंच नाही तर, त्यांच्या प्रकृतीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे अश्विन आधीच सगळ्यांना सांगितले आहे. मात्र, जर प्रतिमा आत्यांनी स्वतः प्रयत्न केला, तर त्यांना याचा त्रास होणार नाही. म्हणूनच आता सायली तिचे वेगळे प्रयत्न सुरू करणार आहे.