Tejashri Pradhan : हो मला आता लग्न करायचं आहे! तेजश्री प्रधानला थाटायचाय पुन्हा संसार; मग अडतंय कुठं?

0
13
Tejashri Pradhan : हो मला आता लग्न करायचं आहे! तेजश्री प्रधानला थाटायचाय पुन्हा संसार; मग अडतंय कुठं?


Tejashri Pradhan Second Marriage : ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चित्रपट गाजवताना दिसतेय. तेजश्री प्रधान ही मराठी मालिकांचा एक आघाडीचा चेहरा आहे. तिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. सध्या तेजश्री मालिकांमध्ये दमदार अभिनय करताना दिसतेय. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता लवकरच तिचा एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ असे या चित्रपटाचे नाव असून, यात सुबोध भावे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री प्रधान हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्याला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अशी इच्छा बोलून दाखवली.



Source link