Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशTeam India | भारताचा संघ महायुद्धाची सज्ज! अशी केली टीम इंडीयाने पाकिस्तानविरुद्ध...

Team India | भारताचा संघ महायुद्धाची सज्ज! अशी केली टीम इंडीयाने पाकिस्तानविरुद्ध तयारी | Navarashtra (नवराष्ट्र)

Team India | भारताचा संघ महायुद्धाची सज्ज! अशी केली टीम इंडीयाने पाकिस्तानविरुद्ध तयारी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारताचा संघ महायुद्धाची सज्ज! अशी केली टीम इंडीयाने पाकिस्तानविरुद्ध तयारी

    टीम इंडिया : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज म्हणजेच 9 जून रोजी सामना रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे. आजच्या या सामान्यांसाठी भारताच्या संघाने जोरदार तयारी केली आहे. भारताच्या संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध पार पडला या सामन्यामध्ये टीम इंडियाने 8 विकेट्सने विजय मिळवला. आजचा हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या विश्वचषकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. भारताच्या संघाच्या सरावाकडे एकदा नजर टाकूया. (फोटो सौजन्य – बीसीसीआय X अकाउंट)

    भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज भारताचा संघ मैदानात उतरेल. कर्णधाराने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले.
    भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध दमदार कामगिरी केली. विश्वचषकाआधी त्यांच्या आयपीएल २०२४ च्या कामगिरीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
    भारताचा अनुभवी आणि स्फोटक फलंदाज विराट कोहलीचा रेकॉर्ड पाकिस्तानविरुद्ध मजबूत आहे त्यामुळे आज भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील.
    भारताच्या संघामधील शिवम दुबे, कुलदीप यादव त्याचबरोबर टीम इंडियासाठी पहिल्यांदा विश्वचषक खेळाडूंकडे लक्ष असणार आहे.
    भारताचा विश्वासू वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. बुमराहने पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments