
Swanandi Tikekar Wedding: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका स्वानंदी टिकेकर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. गायक आशिष कुलकर्णी याच्या सोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘आयुष्यभराची आनंदी साथ’ असे म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. स्वानंदी टिकेकर हि अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. स्वानंदीने आता लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या लग्नाची झलक दाखवली आहे.








