Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनShri Ram: अयोध्येतच नाही, तर प्रवीण तरडे यांच्या घरी देखील विराजमान झाले...

Shri Ram: अयोध्येतच नाही, तर प्रवीण तरडे यांच्या घरी देखील विराजमान झाले प्रभू श्रीराम! व्हिडीओ बघाच

[ad_1]

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अशा वेगवेगळ्या भूमिका चपखलपणे निभावणारे प्रवीण तरडे यांनी देखील आपल्या घरात श्रीरामाची स्थापना केली आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे हिने हा व्हिडीओ शेअर एक पोस्ट लिहिली आहे. ‘सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत. प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु, ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले. नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments