
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. पत्नीला कळताच तिने अंधेरीमधील बेलेव्यू रुग्णालयात त्याला दाखल केले. रात्री १० वाजता श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस काय करत होता याचा व्हिडीओ समोर आला आहे.








