
Actress Vaishnavi Dhanraj Abuse: प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘सीआयडी‘मध्ये इन्स्पेक्टर ताशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी धनराज हिने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. अभिनेत्रीला कुटुंबाकडून जबर मारहाण झाली आहे. तशाच जखमी अवस्थेत वैष्णवी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. अभिनेत्री वैष्णवी धनराज ही अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये झळकली आहे. ‘सीआयडी’, ‘तेरे इश्क में घायाल’ आणि ‘बेपनाह’सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली होती. नुकताच अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती सर्वांकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.








