Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रमा .शरद पवार यांच्या भेटीत बौद्ध समाजाचा निर्धार: "एकच निर्धार; बौद्ध आमदार"

मा .शरद पवार यांच्या भेटीत बौद्ध समाजाचा निर्धार: “एकच निर्धार; बौद्ध आमदार”

बारामती प्रतिनिधा : बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी देशाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत “एकच निर्धार; बौद्ध आमदार” या घोषणेसह समाजाच्या मागण्यांची मांडणी करण्यात आली. शरद पवार यांनी बौद्ध समाजाच्या मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, ते समाजासोबत कायम असल्याचे सांगितले. पवार यांनी मतदारसंघातील विद्यमान परिस्थितीची सखोल माहिती घेतली आणि आगामी निवडणुकीत यावर योग्य निर्णय घेऊ, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या हस्ते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. फलटण-कोरेगाव मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून “एकच निर्धार; बौद्ध आमदार” अशी घोषणा देत बौद्ध समाजाची एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. या मोहिमेत स्थानिक बौद्ध समाजाने राजकीय नेत्यांची भेट घेऊन आपली मागणी ठामपणे मांडली होती. या मागणीची दखल घेत शरद पवार यांनी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्याचे स्पष्ट संकेत दिले.

फलटण-कोरेगाव मतदारसंघातील बौद्ध समाजाचा एकजूट निर्धार

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी “बौद्ध आमदार” या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वीपासून काम सुरू केले होते. या मोहिमेअंतर्गत समाजातील अनेक मान्यवरांनी स्थानिक स्तरावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, बौद्ध समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.

शरद पवार यांची भेट ही या मोहिमेतील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. समाजाने उभारलेल्या “एकच निर्धार; बौद्ध आमदार” या संकल्पनेला यामुळे अधिक बळ मिळाले आहे. शरद पवार यांच्या या भेटीनंतर आगामी निवडणुकीत कोणता राजकीय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments