Sunday, August 30, 2026
HomeसाताराShambhuraj Desai Full PC : आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर, शंभूराज...

Shambhuraj Desai Full PC : आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर, शंभूराज देसाई गरजले-बरसले

Shambhuraj Desai Full PC : आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर, शंभूराज देसाई गरजले-बरसले

[ad_1]

Shambhuraj Desai on Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना थेट आव्हान दिले. तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी समाचार घेतला आहे. 

शंभूराज देसाई म्हणाले की, काल आदित्य ठाकरे यांची कोपरा सभा झाली. खूपच धाडसी विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आश्चर्यकारक विधान उबाठा गटाचे युवराज यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या चार कोपरा सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. आदित्य यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागत आणि नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच आहे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.  

 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments