Shah Rukh Khan News: शाहरुख खानला धमकी देणाऱ्याला अखेर पोलिसांनी केली अटक, चौकशीत उघड झाली अनेक रहस्ये

0
71
Shah Rukh Khan News: शाहरुख खानला धमकी देणाऱ्याला अखेर पोलिसांनी केली अटक, चौकशीत उघड झाली अनेक रहस्ये


Shah Rukh Khan Death Threat Case : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला धमकी देणाच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एका फोन कॉलद्वारे शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती. या धमकीच्या कॉलमुळे मुंबई पोलिसांना तातडीने ॲक्शन मोडमध्ये येऊन आरोपींचा शोध सुरू केला होता. तपासाअंती पोलिसांना कळले की, हा फोन छत्तीसगडमधील रायपूर येथील फैजान नावाच्या व्यक्तीकडून केला गेला होता. मुंबई पोलिसांनी तत्काळ छत्तीसगडमधून त्याला अटक केली आहे आणि चौकशी सुरू केली आहे. 



Source link