Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSet Result : अखेर सेटच्या निकालाला मिळाला मुहूर्त! तब्बल एवढे उमेदवार ठरले...

Set Result : अखेर सेटच्या निकालाला मिळाला मुहूर्त! तब्बल एवढे उमेदवार ठरले पात्र, असा पाहा निकाल

[ad_1]

राज्यातील साहायक प्राध्यापक भरतीसाठी सेट ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. सेट किंवा नेट परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना सहायक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करता येतो. वर्षातून दोनवेळा ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान, सोमवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सेट निकालाची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. सोमवारी ३९वी सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ही परीक्षा ७ एप्रिलला राज्यातील १७ शहरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. तब्बल १ लाख ९ हजार २५० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. दरम्यान, या परीक्षेसाठी एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यमुळे काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास देखील विद्यापीठाला उशीर झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments