Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशSaurabh Netravalkar | पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा |...

Saurabh Netravalkar | पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)

Saurabh Netravalkar | पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा

सोशल मीडियावर सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या संघासाठी ‘सुपर ओव्हर’मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या मनात काय चालले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सौरभ नेत्रावलकर : T -20 विश्वचषकाचा थरार अत्यंत रंगतदार सुरु आहे. विश्वचषकाचा 11 वा सामना 6 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्याचा निकाल तुम्हालापण नक्कीच पटणार नाही. या सामन्यांमध्ये यूएसएच्या संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. हा सामना सुपर ओव्हरपर्यत पोहोचला. शिगेला पोहोचलेल्या या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने (Saurabh Netravalkar) अमेरिकेसाठी ‘सुपर ओव्हर’ टाकली. येथे विरोधी संघ पाकिस्तानला 19 धावा करायच्या होत्या, मात्र ते केवळ 13 धावांपर्यंतच पोहोचू शकले आणि अमेरिकेने विजय मिळवला. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त सौरभ नेत्रावलकरची चर्चा सुरु झाली. (फोटो सौजन्य – wshfreedom इंस्टाग्राम अकाउंट)

सोशल मीडियावर सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या संघासाठी ‘सुपर ओव्हर’मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या मनात काय चालले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर खुद्द सौरभ नेत्रावलकर याने स्वतः दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर सौरभने एएनआयशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या रणनीतीचा खुलासा केला आहे. यावेळी सौरभला पत्रकाराने विचारले की, तू काय विचार करतो या सामन्याबद्दल? यावेळी सौरभने उत्तर दिले की, ही खूप खास भावना आहे. आम्ही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही तयारीमध्ये व्यस्त होतो त्यामुळे ही एक विशेष भावना आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments