Satara: साताऱ्यात खळबळ, एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

0
20
Satara: साताऱ्यात खळबळ, एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळले


आनंदा जाधव (पती) सुनंदा जाधव (पत्नी), संतोष (मुलगा) पुष्पलता (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. आनंद जाधव हे ढेबेवाडी येथील सणबूर येथे वास्तव्यास होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी हे सगळेजण त्यांच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा जाधव यांची तब्येत खालावल्याने त्यांना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आनंदा यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. घरात वीजेची समस्या असल्याने पोर्टेबल ऑक्सिजन मशीनसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र, रात्रभर जनरेटर सुरू ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे झोपेतच घरातील चौघांचा मृत्यू गुदमरून मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.



Source link