Tuesday, August 11, 2026
Homeफलटणसातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
सातारा : संभाजीनगर, सातारा येथील राष्ट्रभाषा भवनाच्या प्रमुख सभागृहात सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे दिनांक २१ जून २०२६ रोजी सेवापूर्ती, पदोन्नती तसेच मंडळाच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

या प्रसंगी सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. मोहन भिसे, श्रीराम खोलेश्वर विद्यालय, मुंजवडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. दीपक मारुती भापकर आणि श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. विठ्ठल बाबूराव निकाळजे यांचा सपत्नीक संपूर्ण पोशाख, स्नेहवस्त्र, श्रीफळ, पुस्तके आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी सातारा येथील प्राचार्य मा. विजय यादव, न्यू इंग्लिश स्कूल, जिहे-कठापूर येथील प्राचार्य मा. अनिल वायदंडे आणि न्यू इंग्लिश स्कूल, जिहे येथील माजी प्राचार्य मा. लक्ष्मण घनवट यांचा शाल, श्रीफळ, स्नेहवस्त्र, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष मा. ता. का. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दयानंद तिवारी (जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थान – मुंबई केंद्र) तसेच मा. डॉ. गजानन भोसले (हिंदी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा) उपस्थित होते.

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे, उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर व इकबाल मुल्ला, राज्य परीक्षा मंत्री सुधाकर माने, विभागीय परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, अध्यक्षा सौ. सुनंदा शिवदास, कार्यवाह अनंत यादव, सहकार्यवाह सौ. दिपाली पवार, भवन समितीचे सचिव श्रीकांत लावंड, राष्ट्रभाषाप्रेमी शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेचे पदाधिकारी, महादेवी वर्मा सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील मंडळाचे पदाधिकारी, हिंदी शिक्षक व सत्कारमूर्तींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायत्री पवार यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.

प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष नेताजी ननावरे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच राष्ट्रभाषा भवनात कार्यरत विविध संस्थांच्या कार्याचा परिचय करून दिला.यानंतर महाराष्ट्र हिंदी अध्यापक मित्र या त्रैमासिक नियतकालिकाच्या एप्रिल-जून अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात हिंदी अध्यापक मंडळ व पितामहांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही मंडळाच्या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गजानन भोसले यांनी आपल्या भाषणात हिंदी अध्यापक मंडळाचा सत्कार म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा सत्कार असल्याचे नमूद केले. मंडळाच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी पितामहांच्या कार्यातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

डॉ. दयानंद तिवारी यांनी महाराष्ट्र ही क्रांती व शांततेची भूमी असल्याचे सांगून हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच पितामह सूर्यवंशी यांचे हिंदीसाठीचे कार्य तपस्वी वृत्तीचे असल्याचे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणात मा. ता. का. सूर्यवंशी यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. सेवाविराम घेतलेल्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवावे, तसेच पदोन्नती मिळालेल्या प्राचार्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिंदी विषयाच्या तासिकांबाबत भविष्यातील आंदोलनासाठी शिक्षकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्या मिनाक्षी बडिगार यांनी प्रभावीपणे केले. कार्यवाह अनंत यादव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.वंदे मातरम्‌च्या सामूहिक गायनाने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments